प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर - बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक्टर चालकाविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील गोदावरी नदी पात्राजवळ डाग पिंपळगाव शिवारात पोलीसांनी रविवारी ही कारवाई केली.गणेश काकासाहेब खरडे रा.सिरसगाव असे या घटनेतील इसमाचे नाव आहे.गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या आधारे पाहणी केली.त्यावेळी खरडे हा त्याच्या ताब्यातील ट्रक्टर मधून वाळूची वाहतूक करीत होता.पोलीसांना पाहुन तो ट्रक्टर सोडून पळुन गेला.सदर वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी पोलिस नाईक गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश खरडे याच्याविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार थोरात हे करीत आहेत.