प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथील कृषि सेवा केंद्रातुन रोख रक्कम व चांदीच्या नाण्यांसह नऊ लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना पकडण्यात वैजापूर पोलिसांना यश आले आहे. अविनाश भाऊसाहेब सुर्यवंशी (२५) व अमोल बाबासाहेब कदम (२१) दोघे रा. सवंदगाव अशी त्यांची नावे असुन पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख ८० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. ही घटना आठ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन दिवसांतच चोरांना गजाआड केले. सवंदगाव येथील विजय भाऊसाहेब कदम यांचे गावातच बियाणांसह रासायनिक खते व कापूस खरेदी - विक्रीचे दुकान आहे. त्यांची सवंदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मध्ये शेतजमीन असून त्या ठिकाणी त्यांनी कांदा चाळ बांधली आहे. त्यांचे गावात घर बांधण्याचे काम सुरु असल्याने ते शेतात राहतात. दुचाकीने शेतात जाणेयेणे करतात. घराचे काम सुरु असल्याने व कापूस खरेदी विक्रीसाठी नगद रकमेची आवश्यकता असल्याने ते रोख रक्कम दुकानात ठेवतात. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करुन ते घरी गेले होते. त्या रात्री त्यांच्या दुकानासमोरील एकाने फोन करुन त्यांना सांगितले की, दोन अनोळखी व्यक्ती दुकानासमोर असून दोघांनी तोंडाला रुमाल बांधला आहे. त्यातील एक जण वरच्या टॉवर मधून दुकानात उतरत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पळ काढला.
दरम्यान माहिती मिळाल्यानंतर विजय कदम आपल्या भावांना घेऊन दुकानात आले. त्यावेळी चोरट्यांनी दाराचा कडीकोंडा तोडून टेबलच्या ड्रॉवरमधील रोख रक्कम व दहा ग्रॅम वजनाचे दहा चांदीचे नाणे चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्यात ९ फेब्रुवारी रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक घाडगे, फौजदार काळे, सहायक फौजदार रज्जाक शेख, हवालदार संजय घुगे, पोलिस नाईक योगेश झाल्टे, पोलिस काॅन्स्टेबल प्रशांत गीते, विजय भोटकर, गणेश पैठणकर आदींचे पथक तयार करण्यात आले.पथकास ठोस पुरावा व खात्री पटल्यानंतर पोलिसांनी अविनाश सुर्यवंशी व अमोल कदम या दोघांनाही पकडून जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख पाच लाख ८० हजार रुपये हस्तगत केले. त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे.आरोपींना येथील न्ययायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे हे करीत आहेत.दरम्यान चोरी झाली.त्यावेळी रात्री दुकान मालक विजय कदम यांना अविनाश सुर्यवंशी याने मोबाईल वर चोरीची माहीती दिली होती.तुमच्या दुकानावरून तोंड बांधलेले दोघे उतरत आहेत.हा फोन करणाराच आरोपी निघाला आहे.
फोटो सह