प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- शहरातील संकटमोचन मारोती मंदीराजवळून एक मोटारसायकल चोरट्यांनी भरदिवसा लंपास केली.ही घटना गुरुवारी घडली.सागर किशोर बिरारी यांची मारोती मंदीराजवळ बिरारी ज्वेलर्स नावाची दुकान आहे.ते आपल्या मोटारसायकल ( एम एच २० ए ई ६४१३) वर दुकानात आले.त्यावेळी त्यांनी आपली मोटार सायकल दुकानासमोर लाॅक करून उभी केली.मात्र ती मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली.सायंकाळी दुकान बंद करून ते घरी जाण्यासाठी निघाले.तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.या मोटारसायकल ची किंमत १५ हजार रुपये इतकी आहे. आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कॅमेऱ्यात कैद झाला आहे.मात्र त्याची ओळख पटली नाही. या प्रकरणी सागर बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.