Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुलाच्या कामासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


        मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नागमठाण (ता. वैजापूर) येथील पुलाचे बांधकाम मागील बारा वर्षांपासुन रखडले आहे. या पुलाचे बांधकाम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी परिसरातील तरुणांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी ते अर्धवट बांधलेल्या पुलावर चढले. वीरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांची समजुत काढली. मात्र याबाबत विभागीय आयुक्तांना घटनास्थळी बोलावुन लेखी आश्वासन द्यावे या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम राहीले. याबाबत अधिक माहिती अशी, वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथे गोदावरी नदीवर मोठा पुल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भुसंपादन केले होते व २००९ मध्ये या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण तब्बल बारा महिने उलटुनही हे काम अपूर्णावस्थेत असल्याने परिसरातील अनेक गावांची गैरसोय होत आहे. हा पुल मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणारा असल्याने महत्वाचा आहे. असे असतांनाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काम वेळेत पुर्ण होत नसल्याने २००९ मध्ये सहा कोटी रुपयांत होणाऱ्या पुलाचे काम आता जवळपास बारा कोटी रुपये खर्चुन करावे लागणार आहे. 

        याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत गणेश तांबे, प्रवीण चव्हाण, सुभाष खुरुद, डॉ‌ बाबासाहेब डांगे, मोहन दिवटे, रामनाथ भवर, गणेश ठोंबरे, मनोज वीरकर, पवन चव्हाण, कृष्णा गवळी, शरद वाढे, राजेंद्र खुरुद यांनी विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन देऊन जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय विजय नरवडे, उपनिरीक्षक कदम व हेड कॉन्स्टेबल गणेश पंडुरे यांनी घटनास्थळी भेट दिली व आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत विभागिय आयुक्त केंद्रेकर यांना घटनास्थळी बोलावुन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे प्रशासनाची पंचाईत झाली‌. आंदोलक संध्याकाळपर्यंत अर्धवट बांधलेल्या पुलावर चढुन बसले होते. 


सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाय बी कुलकर्णी उप  अभियंता काकड, तहसिलदार राहुल गायकवाड, नायब तहसिलदार किरण कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. गोदावरी नदीपात्रात सध्या पाच ते सहा फुट पाणी थांबलेले असुन पाणी पुर्ण कमी झाल्यानंतर गोदापात्रातील पीआरवर स्लॅब टाकण्याचे काम सुरु करण्यात येईल. तसेच वैजापूर बाजुकडील पीआरचे काम शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे थांबले आहे‌ यासाठीची भुसंपादन प्रक्रिया महसुल विभागाच्या सहाय्याने अंतीम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सरकारकडे निधीची मागणी नोंदवुन पुढील कार्यवाही करु असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आमदार रमेश बोरनारे,माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी