महेश साळुंके / प्रतिनिधी निफाङ तालुका
लासलगाव- येथे चर्मकार समाज मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव सोहळा श्रीराम मंदिर लासलगाव याठिकाणी भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सकाळी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची पालखी गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी हरी भक्त पारायण बाळासाहेब महाराज शिरसाट यांचे प्रवचन संपन्न झाले यावर्षी दादाची पुंडलिक थोरात यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचप्रमाणे पुढील वर्षाचे कार्यक्रमाचे नारळ पंकज सतीश पवार यांना देण्यात आले बोला संकेत अतिशय उत्तम पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम वाघ ,सुंदरनाथ सोनवणे, विलास मोरे, शिवाजी खैरनार ,अशोक वाघ, विश्वनाथ आहेर ,संदीप देवरे ,शरद लोहकरे ,विनोद पोटे ,विजय सोनवणे, निलेश देवरे ,सुरज वाघ, अविनाश चव्हाण, रावसाहेब लोहकरे, जगन शेलार, राजू आशान, संजय नगर मित्र मंडळ व लासलगाव पंचक्रोशीतील चर्मकार समाज बांधवांनी सहभाग नोंदविला