देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधि
आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या मनमानी कारभारामुळे व एकांगी निर्णयामुळे तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता परस्पर बैठकी घेऊन ज्या व्यक्तींचे पक्षात प्रवेश इ गालेला नाही त्यांना व्यक्तींना पक्षाचे पदे देण्यात येऊन एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून मनमानी कारभारी करीत आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज होऊन पक्षाची हानी होत आहे. त्यांच्या हेकेखोरपणाला कंटाळून व मनसेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असतांनाही त्यांना डावलून निर्णय घेत असल्यामुळे आम्ही आमच्या पदांचा सामुहीक राजीनामा देत आहोत.राजीनामा पत्रावर बाळराज देशमुख,राजू मांटे,शेख कदीर प्रकाश बससी प्रमोद राजे,शेख शहजाद,बालाज खांडेभराड,नवनाथ रामाने,विजयदेव,रंजीत जोशी.कैलार डोईफोडे,अनंत सानप,सय्यद नईम यांच्यास अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्य स्वाक्षरी आहेत.