प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दोन मोटारसायकल ला धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले.हा अपघात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास वैजापूर येवला रस्त्यावर खामगाव पाटीजवळ घडला.कालू मदन किराडे (१९) हा मध्यप्रदेश राज्यातील बनियान येथील मजूर युवक या अपघातात ठार झाला.तर गोरखलाल गोरेलाल (४५) ,कैलास शिसोदीया (३५) रा.मध्यप्रदेश ,मिजवा अशिफ शेख (१९) व असीफ शेख चाँद शेख (३०) रा.रस्ते सुरेगाव ता.येवला हे चार जण या अपघातात जखमी झाले.
मध्यप्रदेश राज्यातील तीन मजूर हे अंदरसूल वरून मोटार सायकल ( एम पी १२ एम व्ही ९०४१) वर वैजापूर कडे येत होते.तर शेख हे आपल्या मुलीला घेऊन आपल्या घराकडे मोटारसायकल वर ( एम एच ०४ डी एल १४२५) घराकडे म्हणजे रस्ते सुरेगाव येथे जात होते.त्यावेळी वैजापूर येवला रस्त्यावरील खामगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाने दोन्ही मोटार सायकल ला जोराची धडक दिली.या अपघातात कालू जागीच ठार झाला.तर चार जण जखमी झाले.जखमींना नागरीकांनी पोलीसांच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथे जखमीवर उपचार करून तर कालू यास मयत घोषीत केले.अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.