प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- शहरातील बन्सीलाल नगर येथील रहिवासी एका नवविवाहित युवतीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली.आरती गौरव दाभाडे (२४) असे या घटनेतील मयत युवतीचे नाव आहे.विवाहानंतर अवघ्या दोनच महीन्यात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मनमाड येथील रहिवासी अरूण सोनवणे यांची मुलगी आरती हिचा विवाह १९ डिसेंबर २०२१ रोजी वैजापूर येथील गौरव नागनाथ दाभाडे याच्याशी झाला होता.विवाहानंतर अवघ्या तीनच दिवसांत पती पत्नी मध्ये वाद सुरू झाला.गौरव हा दारूच्या व्यसनी गेला होता.हे आरती च्या लक्षात आले.धुमधडाक्यात विवाह लावून देऊन सुद्धा सासरच्या मंडळींच्या अपेक्षा जास्त होत्या.विवाहात सोन्या चांदीचे दागिने तसेच पाच लाख रुपये हुंडा म्हणून दिले होते.
मात्र हुंड्यातील राहीलेले एक लाख रुपये व फ्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपये माहेराहून घेऊन ये.अशी मागणी सासरच्या मंडळींनी आरती कडे केली.त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.या छळास कंटाळून आरती हिने आपली जिवनयात्रा संपवली.शनिवारी दुपारी घरात छताच्या पंख्याला स्कार्फने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.या प्रकरणी तिचे चूलत भाऊ विनय सोमनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरती चा पती गौरव दाभाडे,सासरा नागनाथ शंकर दाभाडे,सासू निर्मला नागनाथ दाभाडे व दिर सौरभ नागनाथ दाभाडे या चार जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.