देऊळगावराजा तालुका प्रतिनिधी
देऊळगाव राजा शहरातून जाणारी आमना नदीच्या पुलावरील खड्डा अत्यंत धोकादायक बनला आहे सदर रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ पहायला मिळते या कडे संबंधित विभागाचे फार फार दुर्लक्ष होतांना दिसते आहे.याच रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती व देऊळगावराजा हायस्कूल असून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात हा रस्ता व पूल काही महिन्यांपूर्वी बनविला सदर ठेकेदाराने निकृष्ट काम केलेले आहे
जेव्हापासून रस्ता तयार झाला तेव्हापासून आतापर्यंत अनेक वेळा हा खड्डा थातूर मातूर बुजविण्यात आला मात्र हा खड्डा एका महिन्यात पुन्हा जैसेथे होत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे बसस्थानकपासून ते देऊळगावराजा हायस्कूल पर्यंत अनेक खड्डे पडलेले आहे यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबधित विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बीजविण्यात यावे असीमागणी जनतेतून होत आहे