प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-तालुक्यातील विरगाव येथील एका गोडावूनला आग लागून जवळपास १० लाख रुपयांचा मंडप संच जळून खाक झाला.ही घटना शनिवारी रात्री घडली.सुनिता काकासाहेब कुभांडे यांचा मंडपाचा व्यवसाय आहे.त्यांनी मंडपाचे साहित्य ठेवण्यासाठी गावात गोडावून उभारले आहे.या गोडावूनमध्ये त्यांनी विवाह समारंभ साठी लागणारे मंडप साहित्य,भांडी व काही घरगुती वापराचे संसारोपयोगी साहीत्य,धान्य,कपडे ठेवलेले होते.कुंभाडे कुटुंबीय हे बाहेरगावी एका लग्न समारंभासाठी गेले होते.त्यावेळी अचानक गोडावूनला आग लागली.परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते.त्यामुळे आग आटोक्यात आली नाही.या घटनेत संपुर्ण साहीत्य जळून खाक झाले.या आगीत कुभांडे यांचे जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.