प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ भिमराव वाघचौरे यांच्या किंजाळकाटे या कादंबरीला शासनाच्या यशवंतराव चव्हाण पुरस्कार योजने अंतर्गत ह ना आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे.एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.शासनाच्या वतीने आयोजित मुंबई येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.डाॅ वाघचौरे यांच्या रानखळघी,पानघळी,गराडा ,अंगरकुस,नवं काटवन,पिंडीवरचे विंचू,जखडन,बिन भिंतीचे घर आदी कादंबऱ्या,मारणावळ,मुठमाती हे कथा संग्रह तसेच समीक्षा ग्रंथ आदी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे.त्यांच्या कादंबऱ्यांना अनेक नामांकित साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले असून विद्यापिठाच्या अभ्यास क्रमातही त्यांच्या कादंबऱ्यांचा समावेश आहे.