Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला जोराची धडक 1 जागीच ठार

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        वैजापूर भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला  पाठिमागून जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास नाशिक- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव पाटीजवळ घडली. ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरखाली गेल्याने तिचा चुराडा झाला. अपघातात ठार झालेला दुचाकीस्वार वैजापूर येथील बस आगारामध्ये प्रमुख कारागीर म्हणून कार्यरत होते. उत्तम शंकरराव आवारे (52 ) असे अपघातात ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.  उत्तम आवारे हे येवला तालुक्यातील नागडे येथून सासरवाडीहून दुचाकीवरून येत असताना त्यांनी वैजापूरकडे येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. 

    धडक दिल्यानंतर त्यांना ट्राॅलीचा मार लागून खाली कोसळले व दुचाकी वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकखाली गेली. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला दुचाकी धडकली.त्या चालकला अपघात झाल्याचे समजलेच नाही. त्यामुळे तो तसाच निघून गेला.  घटनेची माहिती मिळताच येवला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आवारे यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान आवारे हे वैजापूर बस आगारामध्ये प्रमुख कारागीर म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच बस आगारातील कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.