साखरखेडा प्रतिनिधी
नॅशनल युवा स्पोर्ट अँड एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत ओपन फिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने 2022 मध्ये गोवा राज्यातील माडगाव येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये चार विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. निलेश विजय गवई (सिल्वर) तुषार संतोष निंबाळकर (सिल्वर )शैलेश अविनाश खरात (सिल्वर) ओम विलास खरात (ब्राँझ) या विद्यार्थ्यांनी प्रथम शेगाव येथे झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांची गोवा येथे निवड करण्यात आली होती माडगाव येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी आपली चांगली कामगिरी बजावली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये यांची निवड झालेली आहे .त्यांच्या सत्कारा वेळी संस्थेचे सचिव चंद्रशेखर जी शुक्ल ,प्राचार्य एम बी भगत , साधन व्यक्ती पि यू गवई, पीटीआय किशोर कामे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप पागोरे ,शिक्षक सोसायटीचे सचिव पी एस तघरे, माजी उपसरपंच दर्शनकुमार ज्ञानेश्वर गवई, प्रयोगशाळा सहाय्यक गौतम जाधव हे हजर होते