रक्तदान सर्व श्रेष्ठ दान ही चळवळ राबवुन अनेकांना रक्तदाना साठी प्रोत्साहित करुन असंख्य रुग्णांना जीवन दान देणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला रक्तदानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.फाऊंडेशन चे अध्यक्ष जीवन माळी यांनी हा सन्मान स्वीकारला.
राजस्थान कोटा येथील राष्ट्रीय संस्था ह्यूमन सोशल फाऊंडेशन तसेच रक्तदान जीवनदान समिती द्वारा कोटा येथे कोटा प्राईड नॅशनल अवॉर्ड आणि नॅशनल कॉन्फरन्स संपन्न झाली यावेळी देशातील विविध राज्यात रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कॉन्फरन्सला प्रमुख पाहुणे म्हणुन कोटा नगर निगमचे महापौर राजीव अग्रवाल,जेष्ठ समाज सेवक अमित धारिवाल,ह्यूमन सोशल फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक सचिन सिंगला, रक्तदान जीवनदान सेवा समिती कोटा चे संस्थापक नीरज सुमन आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन माळी यांनी जिल्ह्यातच नव्हे तर गरज असेल त्या ठिकाणी धावुन गरजु रुग्णांना रक्ताची उपलब्धतता करुन दिली.आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्वतः 35 पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे घेऊन 1500 पेक्षा जास्त रक्ताच्या बॅग संकलन केल्या आहेत.
तर संपुर्ण जिल्ह्यात व्हाट्सअप्प गृप तयार करुन जिल्ह्यातील प्रत्येक गरजुला अत्यावश्यक वेळेत आपल्या संपर्कात असलेल्या दात्यां कडून रक्त मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करत 3000 पेक्षा जास्त बॅगांचे अत्यावश्यक सेवेत संकलन केले आहे.श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन च्या माध्यमातून केवळ नंदुरबार मध्येच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न होत आहेत आणि त्याचीच प्रचिती म्हणुन जिल्ह्यात रक्तदानासाठी शेकडो रक्तदाते तयार झाले आहेत.या सर्व उल्लेखनीय कार्या बद्दल जीवन माळी यांचा राजस्थान येथील कोटा येथे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र ,तसेच महा वस्त्र देऊन कोटा प्राईड नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.जीवन माळी यांच्या सह देशातील 100 संस्थांच्या प्रतिनिधींना सन्मान देऊन रक्तदानाच्या चळवळीत सतत कार्यरत राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन चे महेंद्र झवर ( नंदूरबार ) हितेश कासार (नंदुरबार) रामकृष्ण पाटील (शहादा),अरुण साळुंखे (तळोदा) सुधिरकुमार ब्राम्हणे (अक्कलकुवा) अजय देवरे ( नंदूरबार ) आकीब शेख ( नंदूरबार ) अभय राजपुत ( नंदूरबार पोलीस ) यांची मोलाची साथ लाभली
हा सन्मान माझा एकट्याचा नव्हे तर संपूर्ण रक्तवीरांचा आहे
पुरस्कार स्विकारल्या नंतर जीवन माळी यांनी सांगितले की, हा राष्ट्रीय सन्मान माझा एकट्याचा नव्हे तर जिल्ह्यातील माझे सर्व सहकारी मित्र व सर्व रक्तदात्यांचा आहे.हा पुरस्कार मला व माझ्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करणारा आहे.या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली असुन जिल्ह्यात सिकलसेल, थॅलेसिमिया ,गरोदर माता यांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते.रक्ताच्या पुरवठ्या पेक्षा मागणी अधिक असते त्यामुळे अनेक वेळा ब्लड बँकां मध्ये रक्त उपलब्ध नसते अशा वेळी आमचे सहकारी तात्काळ ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करतात.जिल्ह्यात आजही गरजे पेक्षा रक्तदात्यांची संख्या खुप कमी आहे.
आम्ही आमच्या पद्धतीने रक्तदानाची चळवळ प्रगल्भ व्हावी यासाठी प्रयत्न करतोय पण या कामाला जी शासकीय यंत्रणा आहे त्यांनी देखील पुढाकाराने आणि जबाबदारीने काम केले तर रक्तासाठी रुग्णांना हाल अपेष्टा करण्याची गरज भासणार नाही.रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील रक्तासाठी इतरांवर अवलंबुन राहण्या पेक्षा आपल्या जवळचा नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी रक्तदान करण्याची तयारी ठेवली तर रक्तासाठी कुणाला ही इतरत्र भटकण्याची वेळ येणार नाही