धारणगांव वीर येथे प्रहार जनशक्ति पक्ष आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी उ.म.संपर्क प्रमुख दत्तु बोङके .उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे व पदाधिकारी |
महेश साळुंके प्रतिनिधी निफाङ तालुका
निफाङ - शालेय शिक्षण व महीला बालकल्याण राज्यमंञी तथा प्रहारचे संस्थापक ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कङु यांच्या संकल्पनेतुन व नवीन वर्षाचे औचीत्य साधुन निफाङ तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दरवर्षी धारणगांव वीर येथे घेण्यात येणारे रक्तदान शिबिर ह्याही वर्षी कोरोनाचे नियम पाळुन घेण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख .दत्तु बोडके व कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ति पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे होते .रक्तदान हेच श्रेष्ठ दान असुन एवढया कडाक्याच्या थंडीत ही रक्तदान करुन लोक जो प्रतिसाद देत आहे ..हि एकप्रकारची देशसेवाच आहे .कोरोनाच्या वाढत्या प्रभावात रक्त पेढीचा पुरवठा कमी पडु न देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.तसेच कुणाचा दवाखान्यासंबंधी कुठलीही समस्या असो ती तात्काळ सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष बांधिल आहे तसैच राज्यमंञी बच्चु कङु यांचे सामाजिक विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच अंध.दिव्यांग.शेतकरी .शेतमजुर निराधारांच्या समस्या सोङवण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रहार पक्षात सहभागी व्हावै असे आवाहन देखिल यावैळी उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे यांनी केले .
यावेळी शाम गोसावी. समाधान बागल तालुकाध्यक्ष दिगंबर वङघुले .उपाध्यक्ष राहुल सोनवने .उपशहरअध्यक्ष शेरखान मुलानी ,तालुका संघटक नानासाहेब सांगळे ,दिनेश काऊतकर राहुल जमधडे.अरुण थोरे. महेश गंभिरे,अमोल गंभिरे,दिपक सोनवणे,भगवान सानप,दत्तु सानप,सुनिल पवार,गणेश सोनवणे स्वप्निल सोनवणे,अन्वर शेख,संतोष आहिरे ,संतोष सोनवणे,खलिल शेख. संदिप सानप. गणेश बोडके. आदी सर्वजणांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.कार्यक्रमचे सुञसंचलन तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवने यांनी केले