Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पवयिन मुलीचा विनयभंग

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


    इन्स्टाग्रामच्या माध्यमातुन ओळख झालेल्या अल्पवयिन मुलीचा विनयभंग केल्याची घटना वैजापूर शहरात बुधवारी उघडकिस आली. याप्रकरणी सटाणा (या. वैजापूर) येथील करण भाऊसाहेब जाधव (१९)  या तरुणाविरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिडित मुलगी ही शहरातील एका शाळेत नववीत शिकत आहे. या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या मित्राकडे येते जाणे सुरु झाल्यानंतर इन्स्टाग्रामच्या माध्यमातुन आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली व तिला भेटण्यासाठी तो वारंवार तिचा पाठलाग करत होता. व भेटण्याचा प्रयत्न करत होता. 

        मात्र मुलीला त्याला भेटण्याची इच्छा नसल्याने याबाबत तिने आईला व काकांना सांगितले. त्यानंतर तिच्या वडीलांनी करण व त्यांचे वडील भाऊसाहेब जाधव यांना बोलावुन समजाऊन सांगितले. तरीही त्यांचे घरासमोर चकरा मारणे व वारंवार पाठलाग करणे थांबले नव्हते. ही मुलगी बुधवारी शाळेत जात असतांना आरोपीने पुन्हा तिचा पाठलाग करणे सुरु केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने संध्याकाळी साडेपाचला घरी आल्यानंतर याबाबत आईला सांगितले. त्यानंतर मुलीने आई वडीलांसोबत थेट पोलिस ठाणे गाठुन करण जाधव यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.