प्रतिनिधी विठ्ठल गावंडे
जळगाव जामोद तालुक्यातील कोरकू समाजाच्या आदिवासी वस्ती असणाऱ्या रायपूर मध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची पटसंख्येत व गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने जळगाव जामोद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री एन.जे.फाळके साहेब यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले.
मैलगाडाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी दुर्गम भागातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची बैल गावातून मिरवणूक असेल सामाजिक ग्रुप तर्फे शालेय साहित्याचे वाटप असेल दिवाळी सेलिब्रेशन स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी असे उपक्रम राबवीले जातात. त्या अंतर्गतच दिनांक 15 जानेवारी 2022 ला जळगाव जामोदचे गटशिक्षणाधिकारी फाळके साहेब यांच्या हस्ते व केंद्रप्रमुख श्री महादेवराव कुवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल भगत सहाय्यक शिक्षक यांनी स्वखर्चाने आणलेल्या शालेय साहित्य व खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. मॅग्नेटिक इंग्रजी अल्फाबेट, अल्फाबेट चे ब्लॉक, मराठी मुळाक्षरे व व्यंजने प्लास्टिकचे, अंक, बिजनेस गेम, शैक्षणिक तक्ते ,क्रिकेट लाकडी सेट ,प्लास्टिक सेट ,पासिंग बॉल, बॅडमिंटन सेट, लगोरी ,प्लास्टिक बाॕल एक डझन, मोठे प्लस्टिक चेंडू , उड्या मारण्यासाठी दोर्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. फाळके साहेबांचे व कुवारे साहेबांचे स्वागत फुलांऐवजी पुस्तक देत सहाय्यक शिक्षक अनिल भगत यांनी केले. कार्यक्रमानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.