प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर - तालुक्यातील जातेगाव टेंभी येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले.नववी व दहावीच्या १०० विद्यार्थ्यांना यावेळी लस देण्यात आली.यावेळी सरपंच भाऊसाहेब बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू पवार, इम्रान शेख,गवंडे,नवसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ आदीत्य बर्वे, सचिन पोकळे,डब्ल्यू जी पठाडे,एच सी माघाडे,दिपीका देवकर,शहीस्ता सय्यद, मुख्याध्यापक महेंद्र नरवडे, सुनिल सांळुके,अलीमोद्दीन काझी, विलास ढोले, काकासाहेब काळे आदींची उपस्थिती होती.