प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-शहरातील माळी गल्लीतून ५४ हजार ५०० रुपयांचे दागिने असलेली एका महीलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली.ही घटना बुधवारी दुपारी घडली.शहरातील फुलेवाडी रोडवरील रहिवासी गंगुबाई अशोक बत्तीशे यांच्या मुलाचा १३ जानेवारी रोजी साखरपुडा होता.त्यामुळे त्यांच्या दोन मुलींना घेऊन बाजारात खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.त्या वेळी बाजारपेठेत मकरसंक्रांत सणामुळे खरेदीची गर्दी असल्याने त्यांनी गळ्यातील दागिने काढून पर्समध्ये ठेवले .त्यानंतर ही पर्स एका पिशवीत ठेवली.
एका दुकानात त्यांनी खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी पर्स काढण्यासाठी पिशवीत हात घातला.मात्र त्यांची पर्स पिशवीत नव्हती.ती पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.पर्समध्ये नेकलेस,अंगठी व साखळी असे एकूण ५४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने होते.या प्रकरणी गंगुबाई बत्तीशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.