प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- बनावट कागदपत्रे तयार करुन शहरातील शहाबाजपूरा भागातील घर परस्पर ८६ वर्षाच्या करारावर भाड्याने दिल्याप्रकरणी एकाच्या वडील व भावासह पाच जणांविरुद्ध पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शहाबाजपुरा भागात भुमापन क्रमांक १८७५ मध्ये ९३.५ चौरस मीटर वर रत्नाकर एकनाथ सुरळे यांचे घर आहे.या घराच्या मुळ कागदपत्रात पी आर कार्डवर भारतीबाई अशोकराव ,निर्मला वसंतराव वाल्मीकर व रत्नाकर एकनाथ सुरळे यांची नावे आहेत.या प्रकरणात फिर्यादी असलेले योगेश रत्नाकर सुरळे हे घराचे मालक यांचा मुलगा आहेत.त्यामुळे वारस म्हणून त्यांचा मिळकतीत हक्क आहे
.त्यांचे वडील ,भाऊ व इतर तीन जणांनी संगनमत करून मुळ कागदपत्रात व पी आर कार्डमध्ये मालक असलेले भारतीबाई अशोकराव व निर्मला वसंतराव वाल्मीककर यांच्या नावावर स्वतःच्या हाताने आळे मारून ती नावे कमी केली. तसेच १३ नोव्हेंबर २०१८ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून ८६ वर्षाच्या करारावर हे घर भाड्याने देण्याचा करारनामा केला.या प्रकरणी संबंधीतावर कारवाई करावी.यासाठी योगेश सुरळे यांनी पोलीस ठाण्यात अनेक चकरा मारल्या.परंतू कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली.न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यानुसार योगेश सुरळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नाकर एकनाथ सुरळे,निलेश रत्नाकर सुरळे,हसीना मुसा शेख, त्रिंबक बापू आप्पा साखरे व वहीद खान साहेब खान या पाच जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.