प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-शहरातील खान गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी गुरूवारी छापा मारला.यावेळी पोलीसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १५ हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.संजय बापू सोनवणे व महावीर भरतसिंग राजपूत रा.वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.
खान गल्लीत जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या आधारे छापा मारून पोलीसांनी ही कारवाई केली.आरोपी तेथे कल्याण मटका नावाचा जुगाराचा अड्डा चालवत होते.या प्रकरणी पोलिस शिपाई उमेश जमधडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय सोनवणे व महावीर राजपूत यांच्या विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.