वैभव सोनवणे मालेगांव तालुका प्रतिनिधि वडेल : के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेल येथे आज दि.12 जानेवारी 2022 बुधवार रोजी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. एस.के. शिरोळे सर व पर्यवेक्षक श्री.बी.डी.सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज माता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती बच्छाव एस एस मॅडम होत्या . प्राचार्य शिरोळे सर व अध्यक्षा यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील अनेक विद्यार्थीनींनी जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एन. एस. जाधव यांनी राजमाता जिजाऊ व श्री.आर .व्ही. दुकळे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधु भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. वीरेंद्र निकम यांनी केले. तसेच श्रीमती एस.टी. अहिरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाचा समारोप केला.