प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- आजार पणामुळे त्रस्त झालेल्या एका वृद्ध इसमाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जांबरगाव येथे रविवारी घडली.ज्ञानेश्वर बाजीराव साठे (६०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.ज्ञानेश्वर हे सात वर्षांपासून आजारी होते.ते आजाराला कंटाळले होते.त्यामुळे शनिवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले.नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी घाटि पोलीस चौकीचे हवालदार एस इ पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,तीन मुली असा परिवार आहे