प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- शेतात रात्रीच्या सुमारास पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.ही घटना तालुक्यातील बेलगाव शिवारात बुधवारी रात्री घडली.अनिल ज्ञानेश्वर औताडे (३०) रा.भग्गाव असे या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे.रात्रीची विज असल्याने औताडे हे बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या बेलगाव शिवारातील गट नंबर १५८ मधील शेतात असलेल्या मका पिकास पाणी देण्यासाठी घरून गेले होते.त्यावेळी विहीरीत पडून त्यांचा मृत्यू झाला.ते सकाळी घरी न आल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद होता.त्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला.
तेव्हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या विहीरीत त्यांचा मृतदेह मिळून आला.घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.त्यांच्या मृतदेहाचे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रक रणी सुनिल ज्ञानेश्वर औताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी असा परिवार आहे.खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष साहेबराव औताडे यांचे ते नातू होते.