Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निफाड नगर पंचायतीत भाजपचा दारुण पराभव; राष्ट्रवादीलाही जबर धक्का शिवसेनेची उंत्तुंग भरारी



महेश साळुंके निफाङ तालुका प्रतिनिधी

निफाङ-नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निफाडमध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. येथील नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, त्यांना साधा भोपळाही फोडता आला नाही. निफाड  नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे मतदारांनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप बनकरांनाही धक्का देत आपला कौल शिवसेना व शहर विकास आघाङीस  असल्याचे स्पष्ट केले आहे. येथे लागलेल्या या निकालाची जिल्ह्याभरात चर्चा सुरू असुन. शिवसेना शहर विकास आघाडीन जोरदार उसळी घेतली आहे निफाडमध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. येथील नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, त्यांना साधा भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्यांचा निफाङ नगर पंचायती मधुन सुपडा साफ झाला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना देखील मोठा धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादी फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

शिवसेनेला  घवघवीत यश

विशेष म्हणजे निफाडमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे आपली प्रतिष्ठा टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत. येथे शिवसेने सर्वाधिक सात जागांवर विजय मिळवला आहे. शहर विकास आघाडी चार, बसपकडे एक आणि काँग्रेसने एक जागा पटकावली आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर शिवसेना, शहर विकास आघाडी, बसपा आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. मतदारांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेल्या कौलाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

विजयी उमेदवार आणि मते

– प्रभाग 01 – बसपा – अरुंधती पवार – 454
– प्रभाग 02 – अपक्ष – शिवाजी ढेपले – 533
– प्रभाग 03 – शिवसेना – अनिल कुंदे – 661
– प्रभाग 04 – शहर विकास आघाडी – शारदा कापसे – 578
– प्रभाग 05 – काँग्रेस – पल्लवी जंगम – 658
– प्रभाग 06 – शहर विकास आघाडी – साहेबराव बर्डे – 424
– प्रभाग 07 – शिवसेना – विमल जाधव – 305
– प्रभाग 08 – शिवसेना – सुलोचना होळकर – 321
– प्रभाग 09 – राष्ट्रवादी – सागर कुंदे – 335
– प्रभाग 10 – शिवसेना – डॉ कविता धारराव – 407
– प्रभाग – 11 शिवसेना – संदीप जेउघाले – 362
– प्रभाग – 12 शिवसेना – रत्नमाला कापसे – 587
– प्रभाग – 13 शिवसेना – रुपाली रंधवे – 502
– प्रभाग 14 – राष्टवादी – जावेद शेख – 372
– प्रभाग 15 – राष्टवादी – किरण कापसे – 306
– प्रभाग 16 – शहर विकास आघाडी – कांताबाई कर्डिले –
– प्रभाग 17 – शहर विकास आघाडी – अलका निकम – 258

अशा मिळाल्या जागा

– एकूण जागा – 17
– शिवसेना – 07
– शहर विकास आघाडी – 04
– राष्ट्रवादी – 03
– काँग्रेस – 01
– बसपा – 01
– इतर – (अपक्ष) – 01
– भाजप – 00