प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापुर तालुक्यातील नांदुरढोक येथे उभारण्यात आलेल्या नवीन रोहीत्रास महावितरणने वीर पत्नी आरती किरण थोरात यांचे नाव दिले आहे.या रोहित्राचे उद्घाटन अधिक्षक अभियंता प्रविण दरोली व आरती थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. जवानांच्या सेवेसाठी महावितरण सदैव तत्पर असून शहिदांच्या सेवेसाठी महावितरण कडून प्रथम प्राधान्याने त्याचें काम मार्गी लावले जाते असे दरोली यांनी यावेळी सांगितले. प्रजासत्ताक दिनी महावितरण कडुन वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील शहिद जवान किरण पोपटराव थोरात यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. तसेच शासकीय योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या रोहितच्या वीरपत्नी आरती किरण थोरात यांचे नाव दिले.
यावेळी आरती थोरात, पोपटराव थोरात, अमोल थोरात, महावितरण चे कार्यकारी अभियंता सुरेश दौड, बाळासाहेब घंगाळे, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे, सहाय्यक अभियंता अनिल डुकरे, नितिन कुलकर्णी महावितरण चे कर्मचारी अनिल कडे, चेतन गायकवाड सुनिल देवरे, मोहन चव्हाण, सुदर्शन मोईन, योगेश कदम, निजाम्मुद्दीन शेख, सचिन डोगंरे, भास्कर शिंदे आदिसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.