वैभव सोनवणे मालेगाव तालुका प्रतिनिधी
मालेगाव : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था , जिल्हा रुग्णालय नाशिक व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग नाशिक व महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील एन . एस . एस . विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरावर स्वेच्छा रक्तदान या विषयावर पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली . जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती.
स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयातील कोमल नरेंद्र शेलार या १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला , तिला डॉ . सी . एम . निकम , प्रा . एन . ए . डोखे , उपप्राचार्य प्रा . पी . एन . निकम , पर्यवेक्षक प्रा . रवींद्र मोरे , एच . बी . भामरे , प्रा . सागर रौंदळ , समुपदेशक देवेंद्र भामरे यांचे मार्गदर्शन लाभले . प्रमुख अतिथी म्हणून डॉ . हितेश महाले , डॉ . योगेश पाटील , डॉ . योगेश परदेशी , नरेंद्र पाटील , कुणाल शेटे उपस्थित होते.