दे.राजा प्रतिनिधी
आपल्या देशाला प्रजासत्ताक बनवण्याचे कार्य अनेक थोर पुरुषांनी केले. स्वातंत्र्यानंतर लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा करताना तिरंगा मानाने डौलत असतो. म्हणून तिरंगा त्याग, शांती,समृद्धी तसेच आपल्या भारताच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वेसर्वा डॉ. मीनल शेळके यांनी केले.
राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचालित राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ शेळके मॅडम बोलत होत्या. कार्यक्रमाला राजमुद्रा करियर पॉईंटचे संचालक विनायक पाटील,ज्योतिरादित्य शेळके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय संविधानावर आपले विचार मांडले. याप्रसंगी सई भोसले या चिमुकलीनेही भाषण केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शेळके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर संविधानाचे प्रकट वाचन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवले त्यामध्ये सुजाता चव्हाण, श्रुती दुणगहू, ज्ञानेश्वरी नागरे, भाविका नागरे, प्राची झोटे यांनी गायन, नृत्य सादर केले तसेच काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन चित्रप्रदर्शन आणि भाषणेही केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मगर सूत्रसंचालन सिमा भोसले तर आभार प्रदर्शन प्राचार्या मनीषा नायडू यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.