प्रतिनिधी विठ्ठल गावंडे
सन्मान कोरोना काळातील शैक्षणिक प्रयत्नांचा या शासनाच्या उपक्रमात जि.प.म.प्रा.शाळा चारबन ने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती द्वारे आज 3 जाने. रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेतील शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद कुबडे उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती हे होते तर प्रशांत डवरे,प्रेमला खरटमोल अधिव्याख्याता डायट अमरावती,ठाकरे साहेब अधिक्षक,मनोज चोरपगार यांची मंचावर उपस्थिती होती.सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.प्रास्तविक मोरे मॅडम यांनी केले.नंतर अमरावती विभागातुन प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने चारबन शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे,स्पर्धेत ऑनलाईन सादरीकरण करणारे दीपक उमाळे,माधव मोसंबे यांचा गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी द्वितीय क्रमांक जे.सी.चा चवरे विद्यालय कारंजा लाड जि.वाशीम तर तृतीय क्रमांक जि.प.शाळा दाभा ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला डायट अमरावती चे अधिव्याख्याता प्रशांत डवरे,प्रेमला खरटमोल व सत्काराला उत्तर देतांना दीपक उमाळे यांनी मनोगत व्यक्त केले.उपसंचालक कुबडे यांनी कोरोना काळात विशेष शैक्षणिक प्रयत्न करून शिक्षण सुरू ठेवल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाला अमरावती,यवतमाळ,वाशीम,अकोला बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हास्तरीय प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त शिक्षकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन गोपाल अभ्यंकर तर आभार मनोज चोरपगार यांनी मानले.