महेश साळुंके प्रतिनिधी निफाङ तालुका
निफाङ तालुक्यात वाढलेल्या गारठ्यामुळे आज तालुक्यात नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी निफाङ तालुक्यातील तपमान तब्बल सातअंशांनी घसरले आहे. निफाडमध्ये सर्वात नीचांकी ६.१ अंश सेल्सियस तपमानाची नोंद कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निफाङ तालुक्या मधील वातावरणात अमुलाग्र बदल झालेला आहे. शितलहर कायम असल्यामुळे सुपुर्ण निफाङ तालुक्यातील नागरीक चांगलेच गारठले आहेत. तर कमाल आणि किमान तपमानात कमालीची घट झाल्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तपमान ७ अंशांपर्यत खाली आल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरमहाराष्ट्र गारठला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीने कहर केला आहे. हिमालय व काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.
त्यामुळे शीतलहर कायम असून तपमानात कमालीची घट झालेली आहे. मकरसंक्रांतिनंतर थंडी कमी होण्याची शक्यता असते, मात्र संक्रांति जवळ आलेली असतानाच तपमानात घट झालेली असल्यामुळे तालुक्यासह लासलगावकर उबदार कपड्यांच्या वापरावर भर देत आहेत, तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्यादेखील दिसून येत आहेत.
नाशिकमधील गेल्या पाच दिवसातील तपमान
०६ जानेवारी : किमान १५.४, कमाल २७.७ अंश सेल्सियस
०७ जानेवारी : किमान १५.०, कमाल २९.० अंश सेल्सियस
०८ जानेवारी : किमान १५.६, कमाल २५.१ अंश सेल्सियस
०९ जानेवारी : किमान १४.९, कमाल २४.३ अंश सेल्सियस
१० जानेवारी : किमान ७.३ अंश सेल्सियस