महेश साळुंके प्रतिनिधी निफाङ तालुका
निफाङ- जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गटातील गावांना महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळी प्रशिक्षण देण्यात येते शासन मान्य पुरस्कृत या कोर्सला महिलांनी प्रवेश घेऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. वनसगाव येथे सदरील प्रशिक्षण वर्ग सुरु असून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा भाजपा नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सुवर्णा ताई जगताप, सौ. स्मिता ताई कुलकर्णी, वैशालीताई डुंबरे, ज्योती शिंदे, लासलगाव भाजपा शहराध्यक्ष शैलजाताई भावसार, कल्याणी ताई डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण शिबिर उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, आई जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळेतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तद्नंतर शाळेतील अपुऱ्या सुविधा यावर भाष्य करत त्यासाठी पाठपुरावा करण्या संदर्भात मुख्याध्यापक श्री राजगुरू सर यांनी सौ सुवर्णा ताई यांना विनंती केली,वनसगाव चे सरपंच महेशजी केदारे यांनी महिलांचे, प्रश्न जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या योजनांचा पाठपुरावा करण्याची विनंती केली, ग्रामपंचायत अंतर्गत सुविधांची माहिती दिली तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कामासाठी प्राधान्य देण्याची मागणी केली. तसेच सुवर्णाताई जगताप यांनी आजवर गटात केलेल्या संपूर्ण कामाची माहिती देत शाळेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले जिल्हा परिषद गट व गणातील ज्या गावातील कामे अपूर्ण आहेत त्यावर कसे काम सुरू आहे याची संपूर्ण माहिती दिली लवकरात लवकर ही कामे मार्गी लावू असे सांगितले महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यात महिला संघटीकरण व सबलीकरण वर भर देऊन त्यासाठी भरीव काम नियोजनात असून त्यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगिताताई कडाळे होत्या सूत्रसंचालन पत्रकार रामभाऊ आवारे सर व महेश भाऊ केदारे यांनी केले तर आभार उपसरपंच राहुल भाऊ डुंबरे यांनी मानले प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षक सौ झांबरे ताई ,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व कर्मचारी वृंद, बचत गट महिला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व परिसरातील नागरिक उपस्थित होते.