Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रेम विवाह करण्यास नकार दिल्याने मुलीचे फोटो सोशल मिडिया वर प्रसिद्ध करण्याची धमकी



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


        वैजापूर- प्रेम विवाह करण्यास नकार दिल्याने मुलीचे फोटो सोशल मिडिया वर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन प्रभाकर सोनवणे व दानीश मुनीर शेख रा.वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.सदर अल्पवयीन मुलीचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे ‌ती सध्या मेहंदी काढण्याचे काम करते .आरोपी सोनवणे व पीडीत मुलीचे त्याच्या मानलेल्या बहिणीच्या हातावर मेहंदी काढण्याच्या कारणावरून ओळख झाली होती.
        त्या ओळखीतून तो मुलीस वेळोवेळी संदेश पाठवत होता.तिचा मोबाईल बंद झाल्यावर सूद्धा त्याने तिच्या मैत्रिणी च्या माध्यमातून तिच्या शी संपर्क केला.त्याने तिच्या घरी जाऊन तिला मिठी मारली.तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे फोटो सोशल मिडिया वर प्रसिद्ध करतो.अशी धमकी दिली.या प्रकरणी सदर मुलीच्या फिर्यादीवरून मोहन प्रभाकर सोनवणे व दानीश मुनीर शेख रा.वैजापूर या दोन जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‌