वैभव सोनवणे मालेगांव सर्व प्रतिनिधी
मालेगांव: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित आर बी एच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव कॅम्प येथील प्राचार्या सौ प्रमिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "शाळा बंद पण शिक्षण चालू" या उपक्रमांतर्गत "शिक्षक आपल्या दारी" या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींची शाळा बंद असल्याने "शिक्षक आपल्या दारी" या उपक्रमाचा नियोजन व शुभारंभ प्राचार्या सौ प्रमिला पाटील, उपमुख्याध्यापिका श्रीमती साळुंखे आर जे, पर्यवेक्षिका श्रीमती शेवाळे पी एस व श्रीमती ठाकरे एल जे, सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत करण्यात आला.
राम मंदिर, सोयगाव, नव वसाहत शिपाई नगर, जलधारा कॉलनी /महादेव मंदिरा जवळ, मारुती मंदिर चर्चच्या मागे, बजरंग कॉलनी, विठ्ठल मंदिर TV सेंटर जवळ, पवन नगर - गणपती मंदिर इत्यादी ठिकाणी शिक्षक बंधुभगिनी ग्रुपने उपस्थित राहून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींचे स्वाध्याय, प्रयोग वही आदीं कामकाज तपासले गेले. अधिकारी वर्गाने जागेवर जाऊन तपासणी केली आणि मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्या सौ प्रमिला पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत ऑनलाइन अध्यापनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊ अभ्यास करण्याचे आवाहन केले..