Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वकील संघ ग्राहक संस्थेच्या अध्यक्ष पदी अँड सोपान पवार यांची निवड

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        वैजापूर वकील संघ ग्राहक संस्थेच्या अध्यक्ष पदी अँड सोपान पवार यांची बुधवारी निवड करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष अँड हरीभाऊ जानेफळकर यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते.नवीन अध्यक्ष निवडीसाठी   अँड प्रमोद  जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा घेण्यात आली.या सभेत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ख्रिस्ती  व टी एन गोमलाडु यांनी सभेचे कामकाज पाहिले.त्यांना कर्मचारी योगेश पवार यांनी सहाय्य केले.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष पवार यांच्या सह संचालक अँड रियासत अली ,  अँड आर डी थोट अँड पि एस. साखरे, अँड सविता पाटणी-दहिभाते, अँड नुजहत बेगम ,अँड एस आर बारसे यांची सभेस उपस्थिती होती. 

        नवनिर्वाचित अध्यक्ष अँड सोपान पवार यांचे  जिल्हा वकील संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अँड अनिल रोठे, सचिव अँड सईद अली, अँड आसाराम रोठे अँड के बी कदम ,अँड एस एस ठोळे, अँड अशोक चव्हाण, अँड मनोहर दिवाकर, अँड जे डी हरिदास, अँड ए एम बागुल, अँड व्हि जी वाघ, अँड आर पी बोडखे, अँड मजहर बेगम ,अँड राफे, अँड संतोष जेजुरकर, अँड संजय बत्तीसे, अँड किरण त्रिभुवन, अँड शरद हारदे, अँड संदीप पाटील, अँड संदीप डोंगरे, अँड सचिन मगर, अँड रविराज शिंदे ,अँड गंडे ,अँड देविदास बावचे, अँड पवन राजपूत ,अँड कटारे, अँड कुणाल हरिदास आदींची उपस्थिती होती.