प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-रस्त्यावर गाड्या लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या सात भाजीपाला व फळविक्रेत्याविरूद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.गुरूवारी नवीन भाजी मंडई परिसरात पोलीसांनी ही कारवाई केली.
शहरातून नांदगाव - शिवूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो.या महामार्गालगत शहरात नवीन भाजी मंडई आहे.या भागात नागरीकांची मोठी वर्दळ असते.येथील काही भाजी व फळ विक्रेते दांडगाई करून मंडई ऐवजी रस्त्यावर आपली दुकाने थाटतात.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.त्यामुळे दररोज छोटे व मोठे अपघात होतात.तसेच वाहतूक ठप्प होऊन वाहन धारकांना विनाकारण त्रास होतो.
त्यांना पोलीस यंत्रणेने समजावून सांगून सुद्धा ते जुमानात नाही.त्यामुळे पोलीसांनी या विक्रेत्यांवर थेट गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत, कर्मचारी डी ए शिंदे , गणेश पैठणकर, अमोल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या प्रकरणी अतूल अनिल निखाडे,अश्फाक खान रज्जाक खान,एजाज खान अलीम खान,नदीम खान आरेफ खान,फरहाण रशीद खान,अरबाज खान युसुफ खान,मुजीब खान मुसा या सात विक्रेत्यांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक डी एम शिंदे व सिंगल हे करीत आहेत.