प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
औरंगाबादेत हिंदवी सुर्य महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा येथील राजपूत युवक क्षत्रिय संघटना व राजपुत समाजातर्फे रविवारी निषेध करण्यात आला. राजपूत समाजाचे जेष्ठ नागरिक धोंडिराम सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजबांधव महाराणा यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. यावेळी संजय राजपूत, धीरज राजपूत, प्रेम राजपूत, नगरसेवक गणेश खैरे, जितू राजपूत, सागर राजपूत,शरद राजपूत,राजू चहावाले,गौरव दौडे,शैलेश पोंदे,स्वप्नील राजपूत,सोनू राजपूत,सागर सुरजमल राजपूत,पवन राजपूत,संदीप व्यवहारे,एस. खनिजो,सम्राट राजपूत, प्रमोद राजपूत या सर्वांनी हिंदवी सूर्य महाराणा प्रतापसिंहजींचा पुतळा झालाच पाहिजे, जलील यांचा धिक्कार असो, महाराणा प्रतापसिंह की जय अशा घोषणा दिल्या. हातात जलील यांचा निषेध करणारी पत्रके घेऊन येथील महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्या
समोर हा निषेध केला.शहरातील सर्व थरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.