Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बोरस्ते विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन



महेश साळुंके प्रतिनिधी निफाड तालुका

ओझर - येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.   यावेळी प्रमुख अतिथी स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. के एम. शिंदे, सदस्य धोंडीराम पगार,मुख्याध्यापक सुभाष आहेर, उपमुख्याध्यापिका सुनिता नलावडे, पर्यवेक्षक शरद ठोंबरे यांच्या हस्ते जिजाऊं,सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
        याप्रसंगी कला शिक्षिका मोनाली निकम यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या भव्य रांगोळी चित्राचे उदघाटन फित कापून अतिथींनी केले. विद्यार्थी मनोगत  रोहिणी चौधरी हीने राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याविषयी, तर कावेरी चौधरी, शेखर मोरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. यावेळी कु. सई मोहन हीने " माँसाहेब " ही एकपात्री नाटिका सादर केली. कु.शेखर मोरे याने छत्रपतींचा पोवाडा सादर केला. चारोळी कु. रेणू भडके हीने सादर केली. कु. साक्षी गवारे हीने राजमाता जिजाऊ यांची ओवी सादर केली. ऐश्वर्या पवार या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केली, तर रेणू भडके हीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली.


    शिक्षक मनोगत रवींद्र निकम यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय मनोगतात के. एम. शिंदे यांनी जिजाऊं, सावित्री व स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन उपस्थितांना केले. यावेळी कला शिक्षिका मोनाली निकम यांच्या रांगोळी चित्राचे त्यांनी कौतुक केले.
       यावेळी कार्यक्रमास विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुनिता नलावडे, पर्यवेक्षक शरद ठोंबरे, विजय शिंदे, विशाल कातकाडे, योगेश भंडारे तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदलाल पगार अशोक हळदे,अनिल काळे, पुंडलिक जाधव, महेश जाधव , भाऊसाहेब वाघ, योगेश डंबाळे यांनी परिश्रम घेतले.
    प्रास्ताविक कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले.सूत्रसंचलन कु. इंद्रायणी भडांगे हीने केले, तर विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी भडांगे हीने आभार मानले.