वैभव सोनवणे मालेगाव प्रतिनिधी
मालेगांव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या मालेगांव तालुक्यातील चंदनपुरी येथील यात्रोत्सव कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे . गेल्या दोन वर्षांपासून हा यात्रोत्सव बंद ठेवण्यात आला आहे . येत्या मंगळवारी ( दि . १७ ) जानेवारी पौष पौणिमेपासून यात्रोत्सव सुरू होणार होता . मात्र , गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे , प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी यात्रा रद्द करण्याच्या सूचना तालुक्यातील चंदनपुरी येथील ग्रामपंचायतीला दिल्या आहेत . त्यानुसार , सरपंच विनोद शेलार यांनी यात्रोत्सव बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे .
तसेच खंडेराव महाराज देवस्थान परिसरात दिवट्या बुधल्या व इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे . भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांसाठी चंदनपुरीला येऊ नये . नियमांचे उल्लंघन केल्यास चंदनपुरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सरपंच शेलार यांनी दिला