सिं.राजा/ बुलडाणा जिल्ह्यात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचा विस्तार केला जात आहे. सर्व जाती धर्माचे लोक रिपब्लिकन सेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष वाढीस प्रयत्न करत आहेत. असेच उत्स्फूर्तपणे लोक रिपब्लिकन सेनेला जोडले जावेत यासाठी आम्ही कार्यरत आहोत, आनंदराज आंबेडकर साहेब यांची ठाम भूमिका आहे कार्यकर्त्यांनी मला साथ द्यावी . मी कार्यकर्त्यांना सत्ता देईल बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे झंझावात हा निर्माण व्हायला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब, लोकनेते विजयदादा वाकोडे, विदर्भ अध्यक्ष योगेन्द्र चवरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मुजीब पठाण, युवा प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे, युवा प्रदेश उपाध्यक्ष भाई दिलीप खरात यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तथागत भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन सिंदखेडराजा तालुक्यातील खापरखुटी खामगाव या गावात दि. २ जानेवारी २०२२ रोजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांच्या हस्ते रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मभाऊ साळवे, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष सलीम भाई, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव काकडे, पेंटर संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाऊ इंगळे, जिल्हा सचिव सत्य कुटे व महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई जाधव, सि.राजा तालुका अध्यक्ष ब्रह्मा पाडमुख, अॅड. डोंगरदिवे, जिल्हा महासचिव संदीप इंगळे, जिल्हा संघटन विशाल गवई, जिल्हा उपाध्यक्ष अधिकार घेवंदे, युवा तालुकाध्यक्ष अमोल गवई, दे. राजा तालुका अध्यक्ष विठ्ठल झिने, गौतम कासारे दे. राजा शहराध्यक्ष, शेख शकील युवा शहराध्यक्ष दे. राजा, सि. राजा तालुका उपाध्यक्ष किशोर पाडमुख, तालुका संघटक विशाल साळवे, तालुका संपर्क प्रमुख बाळू मस्के, तालुका प्रसिद्धीप्रमुख अमोल खरात, अमोल गवई युवा तालुका अध्यक्ष, अमोल जाधव तालुका उपाध्यक्ष, वाघोरा उपसरपंच संदीप जाधव, खापरखुटी शाखा अध्यक्ष, सिद्धार्थ जाधव शाखा सचिव, रवी जाधव शाखा उपाध्यक्ष तरी सर्व रिपब्लिकन सेनेच्या सिंदखेड राजा व दे.राजा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.