प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर तालुका खाजगी शिक्षक सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी सुनिल रामदास व्यवहारे यांची निवड करण्यात आली. आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयात खासगी शिक्षकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत खासगी शिक्षक सेनेची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.आमदार बोरनारे यांनी नुतन पदाधिकारी यांचे स्वागत केले. मराठवाडा शिक्षक सेना कार्याध्यक्ष नामदेवराव सोनवने, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर सोनवने, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, शिक्षकसेना तालुकाध्यक्ष सोमनाथ जगदाळे यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे ,आमदार प्रा.रमेश बोरनारे , जिल्हा शिक्षक सेना पदाधिकारी यांच्या आदेशान्ववये ही कार्यकारिणी स्थापन करून घोषीत करण्यात आली.ती पुढील प्रमाणे- तालुकाप्रमुख- सुनील रामदास व्यवहारे, प्रसिद्धीप्रमुख:-विलास रावसाहेब बोर्डे , सरचिटणीस रामदास माणिकराव पिंपळे,संपर्कप्रमुख अरुण चांगदेव खजुरे, उपतालुकाप्रमुख- गणेश कोंडीराम कदम ,कार्याध्यक्ष-श्री संदीप रामभाऊ देवरे,कोषाध्यक्ष- किरण रामदास जाधव आदींची निवड करण्याता आली. याप्रसंगी शिक्षक सेना मराठवाडा कार्याध्यक्ष नामदेव सोनवने व शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षक सेनेचे लक्ष्मण ठुबे,शिवाजी कुमावत ,काशिनाथ वसईकर ,मनोज सोनवणे ,नितीन आसने ,साईनाथ कवार ,सुयोग बोऱ्हाडे ,अशिर शेख, मनोज सोनवणे ,जालिंदर जाधव,राजेंद्र जाधव ,
विलास बोर्डे आदींची उपस्थिती होती.