प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
नगरपालिकेतील सफाई कामगार संजु रामदास गायकवाड ( वय ३८, रा. स्वामी समर्थ नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकिस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असुन ते दोन दिवसांपुर्वी गावी गेले होते. घरात कुणीही नसतांना त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल बाविस्कर करीत आहेत