Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरपंच श्रीमती रुपाली विनोद कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण.




प्रतिनिधी बाळासाहेब कदम लासुरगाव 

वैजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राहेगाव येथील महिला सरपंच सौ रूपाली विनोद कदम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा उंदिरवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत  राहेगाव ,सोनवाडी, राजुरा, उंदिरवाडी पाशापूर शाळांना भेटी देत शाळांची स्थिती व गुणवत्ता निरीक्षण करीत आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनी जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा उंदिरवाडी येथील उपक्रमशील सहशिक्षक  अंगद गोविंदराव लोणे    जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राहेगाव येथील उपक्रमशील सहशिक्षक संतोष उत्तमराव नन्नावरे, उं  पोलीस पाटील दिलीप चव्हाण पोलीस पाटील चंद्रभान मस्के यांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासकीय सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना कालावधीत सेवा दिल्याबद्दल आशा कार्यकर्त्या,स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका पुष्पाताई कदम, अनिता चांगदेव शेलार,कावेरी दादासाहेब म्हस्के,ज्योती सतीश बोरकर,छाया देवगिरी गिरी यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री अर्जुन गंगाधर खरबडे, सरपंच रूपाली विनोद कदम, सरपंच पती विनोद  कदम, उपसरपंच पांडुरंग बोरकर, रावसाहेब अप्पा शेलार, बाबासाहेब झाल्टे,लीलाबाई शामराव मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  बाळासाहेब शेषराव कदम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर त्रिभुवन, सर्व सन्माननीय शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, राहेगाव शाळेचे चे मुख्याध्यापक संतोष नामदेव आढाव,सोनवाडी शाळेचे मुख्याध्यापक रामनाथ कचरू चापडे,उंदिर वाडी शाळेचे  मुख्याध्यापक संजय एकनाथ धनाड,पदवीधर शिक्षक राजाराम धस, सहशिक्षिका श्रीमती पायल नानासाहेब बोडखे, श्रीमती सुचेता हरेगावकर, श्रीमती कल्पना नावंदर,
श्रीमती ज्योती बोरकर,कावेरी म्हस्के, रामनाथ पाटील शेलार, शांताराम मस्के,मोतीलाल झाल्टे, कांताराव राऊत,
शांताराम म्हस्के,गणेश म्हस्के,ज्ञानदेव कदम,  सुदाम कदम,पुंडलिक कदम,गोकुळ कदम,किरण कदम, गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.