विजेता स्पोर्ट्सच्या वतीने घेण्यात आलेल्या १८ व्या ग्रेड बेल्ट परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे |
प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर : येथील विजेता स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंची इंगळे हाॅस्पिटल हाॅलच्या नियमित प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी १८ वी ग्रेडबेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये एकुण १६ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता सदरच्या परीक्षेमध्ये खेळाडूंची शारीरिक गुणवत्ता चाचणी, आवश्यक असलेल्या काता परीक्षा, आंतरराष्ट्रीय कराटे नियमानुसार योग्य गार्डस् वापरून फाईट परीक्षा आणि लेखी परीक्षा संस्थेचे मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यामध्ये यलो बेल्ट - श्रेयश संदिप मोटे, श्रेया संदिप मोटे, भाग्यश्री संजय नवले.
ऑरेंज बेल्ट - देवांश निलेश नरवडे.
पर्पल बेल्ट - प्रिन्स विजय पाटील, पवन भारत कोल्हे, स्वदीपा संदिप त्रिभुवन,सरगम संदिप त्रिभुवन.
ग्रीन बेल्ट - साई गणेश निखाडे, वैश्नवी संजय त्रिभुवन, मानसी कर्नल रक्ताटे.
रेड बेल्ट - तन्मय विजय माताडे, अलोक बाळु इंगळे.
ब्राऊन बेल्ट - अथर्व दत्तात्रय घाटे, समृद्धी मनोज पारे.
ब्लॅक बेल्ट- यश गणेश निखाडे या सर्व खेळाडूंना विजेता स्पोर्टस् असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
वरील खेळाडू हे विजेता स्पोर्टस् च्या नियमित प्रशिक्षण वर्गात मिक्स मार्शल आर्टस् चे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी पारस घाटे, राजेंद्र जोशी, किरण आगाज तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.