Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

के.बी.एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय वडेल येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्सहात साजरा



वैभव सोनवणे मालेगाव  प्रतिनिधी
मालेगाव :  दि. २६जानेवारी रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित  के.बी.एच माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय वडेल व ग्रामपंचायत वडेल यांच्या संयुक्त विदयमाने आज  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी वडेल गावातील प्रगतीशील शेतकरी श्री.रोहीदास गोपा शेलार यांच्या शुभहस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . ताराचंद सुकदेव महाले हे होते. तसेच विविध कार्यकारी सोसायटी वडेल व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वडेल यांच्या संयुक्त विदयमाने ध्वजारोहण  प्रगतीशील शेतकरी श्री . नारायण सिताराम सोनवणे यांच्या शुभहस्ते  करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री एम.आर. सोनवणे व श्री. एच.एस.देशमुख यांनी विशेष प्रयत्न केलेत. या कार्यक्रमासाठी वडेल गावाचे  सरपंच   उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य  सोसायटीचे चेअरमन व्हा.चेअरमन सदस्य व ग्रामस्थ तसेच विदयालयाचे प्राचार्य मा.श्री.एस.के.शिरोळे सर पर्यवेक्षक श्री. बी.डी. सोनवणे सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधुभगिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वीरेंद्र निकम सर यांनी केले तर आभारप्रदर्शनाने श्री.के.बी.अहिरे सर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.