प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- ठेकेदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील निमगोंदगाव ग्रूप ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे.वसंत सिताराम इंगळे असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.फिर्यादी ठेकेदार यांनी ग्रामपंचायत अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले होते.बिल काढण्यासाठी ते ग्रामपंचायत कार्यालयात काही दिवसांपासून चकरा मारत होते.परंतू ग्रामसेवक इंगळे याने बिल काढण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
त्याने बिलातून परस्पर ३५ हजार रुपये काढून घेतले.मात्र फिर्यादीला लाच देणे मंजूर नव्हते.म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सुर्यवंशी, सुनिल पाटील,नागरगोजे , सी एन बागूल यांच्या पथकाने तपास करून आरोपी इंगळे यास अटक केली.या प्रकरणी इंगळे याच्या विरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.