Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जळगाव जामोद पोलिसांनी केला लाखो रुपयांचा गुटखा जप्त




प्रतिनिधी विठ्ठल गावंडे

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना दिनांक 5 जानेवारी रोजी गोपनीय बातमी दारा कडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बरामपुर कडून जळगाव जामोद कडे येणारी टाटा इंडिगो माझा गाडी क्रमांक एम एच 28 व्हि.3300 आणि मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच 18 डब्लू 1838 या वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आरोग्यास अपायकारक व मानवी जिवितास हानीकारक व दुखापत होईल असा गुटखा वाहतूक केल्या जात आहे अशी खात्रीलायक  माहीती मिळताच ठाणेदार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव पाटील, निलेश पुंडे, सचिन राजपुत ,सुरज गवई हे पोलिस कर्मचारी खाजगी वाहनाने जावून  ब-हाणपुर रोड येथील आमपाणी जवळ दुपारी 3.30 वाजता गेले असता टाटा इंडिगो माझा गाडी क्रमांक एम एच 28 व्हि 3300  आणि मारुती सुझुकी स्विफ डिझायर गाडी क्रमांक एम.एव 18 डब्लु 1838 हे दोन वाहन येतांना दिसले .वाहन धांबवले असता त्यापैकी टाटा इंडिगो  गाडीचा चालक हा अमोल शत्रुघ्न राजनकार वय 25 वर्ष श खेडौ बु ता जळगांव जामोद जि बुलडाणा  अशी माहिती त्याने सांगितले .
        तसेच दुसऱ्या वाहन चालकास नाव विचारले असता दिपक नारायन इंगळे वय 22 वर्ष  राहणार आसलगांव ता जळगाव जामोद जि बुलडाना असे सांगितले .या दोन्ही  वाहनांची पंचासमक्ष झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक व मानवी जिवितास हानीकारक  होईल असा सुगंधीत गुटखा पानमसाला मिळुन आला.दोन्ही वाहनातून चार लाख 95 हजार साहशे,आणि दोन्ही वाहनाची किंमत 3 लाख असा एकूण 7लाख 95 हजार साहशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नमुद आरोपीचा पी.सी.आर घेण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक साहेब बुलढाणा, अपर पोलीस अधिक्षक खामगांव, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि सुनिल अंबुलकर यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील,निलेश पुंडे, सचिन राजपुत, योगेश निंबोळकर यांनी केली.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या गार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन वाकडे व सचिन राजपुत हे करीत आहेत.