वैभव सोनवणे मालेगांव प्रतिनिधि
मालेगाव : वाढत्या थंडीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन व शहा परिवारातर्फे अंजुमन दारूलफलाह अनाथाश्रमातील ३७ बालकांना ऊब देत ब्लॅंकेंटचे वाटप करण्यात आले . सरलाबेन शहा यांच्या सहकार्याने या लेकरांना ही ब्लॅंकेंट रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. टी. पी. देवरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र दिघे , प्रकल्प संयोजक सचिन शहा , सोहेल मुसानी उपस्थित होते.
यावेळी सचिन शहा, राजेंद्र दिघे, डॉ टी. पी. देवरे यांनी मुलांशी संवाद साधला. चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन केले . अंजुमन संस्थेच्या पदाधिकारी यांनी रोटरी व शहा परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले . यावेळी वकील अन्सारी , हाफीज शेख , कल्लु उस्ताद , अरिफ भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते .