महेश साळुंके प्रतिनिधी निफाङ तालुका
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशानुसार इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 वी चे वर्ग कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळून दि. 24/01/2022 पासून पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आले. शाळेत येताना तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे इत्यादी कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळणे सर्वांना बंधनकारक असणार आहे. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन नोंद केली जाणार असून विद्यार्थ्यास शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमती पत्र आवश्यक असणार आहे. वर्ग सुरु करणे बाबतच्या सर्व सूचना विद्यार्थी व पालकांना वर्गशिक्षकांमार्फत देण्यात आल्या असून याबाबत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी केले.