प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
श्रावण बाळ योजना, निराधार योजने अंतर्गत मागील दोन वर्षापासून समितीची बैठक झाली नसल्याने निराधार योजनांचे अनेक प्रस्ताव धुळ खात पडुन आहेत. ही बैठक ताताडीने घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तहसिल कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रभारी तहसिलदार मनोहर वाणी यांना निवेदन दिले.
याआधीही संजय गांधी निराधार योजनेची बैठक घ्यावी म्हणून शेळके यांनी निवेदन दिले होते. तालुक्यातील जवळपास चार हजार ५०० लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असून वृद्ध महिला, पुरुष व अन्य लाभार्थीवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रसंगी , प्रेम राजपूत, अमोल बावचे, कार्याध्यक्ष लखन त्रिभुवन, अक्षय बुट्टे, भारत कदम आदी उपस्थित होते. दरम्यान, नियमित तहसिलदार हजर झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन बैठक घेण्यात येईल असे आश्वासन वाणी यांनी दिले