रत्नागिरी: प्रतिनिधी
कोकणातील रत्नागिरी येथील बाली ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष, प्रमाणिक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर सुमय्या यांची बदली झाल्यामुळे त्यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी फुलगुच्छ व शाल देऊन सत्कार केला त्यावेळी सत्कार करताना अमोल पाटील म्हणाले की, डॉक्टर सुमय्या सारखे प्रामाणिक वैदयकीय अधिकारी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कमी आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्ये रुग्णांना चांगली सेवा दिली कोविडचा काळ भयावह असताना सुद्धा डॉक्टर सुमय्या डगमगल्या नाही. नेहमीच कोविड रुग्णांना काळजी न करण्याचे आवाहन केले कारण , डॉक्टर सुमय्या या त्या रुग्णांना धीर देत राहिल्या त्यामुळे रुग्ण केवळ त्यांच्या आस्थेवाईकपणाच्या बोलण्यामुळे बरे होऊन घरी गेले आहेत त्यांनी पाली रुग्णालयातच नव्हे तर जनसामान्यांमध्ये सुध्दा आपली प्रतिमा, आपलं कार्य उज्वल करून ठेवले अशा अधिकार्यांची उणीव रत्नागिरीच्या पाली रुग्णालयाला भासणार आहे असे भावुक उद्गार अमोल पाटील यांनी निरोप व सत्कार समारंभाच्या वेळी काढले त्यावेळी वैदयकीय क्षेत्रातील डॉक्टर नर्सेस उपस्थित होत्या